आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:पावडर कोटिंग कारखान्यात स्फोट, मालक ठार, तीन जखमी; भट्टीवर अॅल्युमिनियम गरम करताना वायुगळती

बीड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटानंतर कारखाना परिसरात झालेली गर्दी. - Divya Marathi
स्फोटानंतर कारखाना परिसरात झालेली गर्दी.

पांगरी रस्त्यावरील अॅनोडायझिंग व पावडर काेटिंग कारखान्यात रंग देण्यासाठी भट्टीवर अॅल्युमिनियम गरम करताना वायुगळती झाल्याने स्फोट होऊन कारखाना मालक जागीच ठार झाला, तर अन्य तिघे जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. तिन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत. संतोष दामोदर गिराम (३२) असे मृत कारखाना मालकाचे नाव आहे. शहरातील गिरामनगरजवळ गिराम यांचा अॅनोडायझिंग व पावडर कोटिंगचा कारखाना असून या ठिकाणी खिडक्या, दरवाजे व अॅल्युमिनियमचे साहित्य तयार केले जाते. सोमवारी दुपारी कारखाना मालक संतोष गिराम, त्यांचे भाऊ जगदीश दामोदर गिराम, अनिकेत गांडुळे व एक परप्रांतीय कामगार असे चौघे कारखान्यात काम करत होते. रंग देण्यासाठी भट्टीवर अॅल्युमिनियम गरम करत असताना वायुगळती होऊन मोठा स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरून गेला. आवाज कानी पडताच नागरिकांनी कारखान्याकडे धाव घेतली. या स्फोटात संतोष गिराम यांच्यासह इतर तिघे जखमी झाले. चौघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु कारखाना मालक संतोष गिराम यांना तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील बिर्ला, उपनिरीक्षक गणेश गोडसे यांनी भेट दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser