आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच:पाच हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी गजाआड

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा सेवाज्येष्ठता यादीत समावेश करून प्रस्ताव जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठवण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या माजलगाव पंचायत समितीचा विस्तार अधिकारी रामचंद्र रोटेवाड याला एसीबीने सोमवारी गजाआड केले. माजलगाव पंचायत समितीत ही कारवाई केली गेली.

रामचंद्र रोटेवाडकडे ग्रामपंचायत विभाग आहे. माजलगाव तालुक्यातील केसापुरी येथील ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला सेवेची दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांचा सेवाज्येष्ठता यादीत समावेश करून प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी राटेवाड याने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी केली गेली हाेती. सोमवारी माजलगाव पंचायत समितीत एसीबीने सापळा लावला. रोटेवाडने पाच हजारांची लाच स्वीकारली. पथकाने त्यांना गजाआड केले. ही कारवाई पोलिस

निरीक्षक अमोल धस, कर्मचारी भारत गारदे, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...