आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार:व्यायाम शाळेत मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार ; लिंबागणेशमधील खुल्या व्यायामशाळेच्या कामात भ्रष्टाचार

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्यामार्फत ग्रामिणभागामधील खुल्या व्यायाम शाळेत मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून शाळा न बांधताच देयके अदा करण्यात आली असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायतीच्या अंतर्गत बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या स्थानिक विकास निधीतून ४ लाख रुपये खर्चून ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खुली व्यायामशाळा तयार करण्यात आल्याचे कागदोपत्री दिसून येत आहे. यासाठी १७ मार्च २०२२ रोजी हे काम सुरु करण्यात आले व १८ मार्च रोजी एकाच दिवसात काम पूर्ण केले गेले असल्याचीही नोंद आहे.

अशा प्रकारचा फलकही या आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या गोदामात आढळून आला आहे. दरम्यान, कुठलीही व्यायामशाळा तयार न करता ४ लाख रुपयांचा रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे डॉ. गणेश ढवळे, युनूस शेख यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, लिंबागणेश येथील खुली व्यायाम शाळाच चोरीला गेली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी काही दिवसांनी पंचायत राज समिती येणार असून या पंचायत राज समितीकडेही याबाबत तक्रार करणार असल्याचे डॉ. ढवळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...