आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखंडणी मागणे, चोरी करणे, शस्त्राचा धाक दाखवून लुटणे आदी सात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाची एमपीडीए कायाद्याअंतर्गत हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार कारवाई झाली आहे.
आरोपी शेख एजाज शेख अमजद (वय २५, रा. नाळवंडी नाका) असे आरोपीचे नाव आहे. शेख एजाज अमजदवर शहर पोलीस ठाणे, कळंब, आनंदनगर (उस्मानाबाद) पोलीस ठाण्यात खंडणी मागणे, जबरी चोरी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, शिवीगाळ करणे, शस्त्र बाळगणे यासह सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका गुन्ह्यात आरोपीला न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली. चार गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. तर गुन्हे पोलिस तपासावर आहेत. शेख एजाज शेख अमजद बीडमधील व्यापाऱ्यांना खंडणी मागून त्रास देत होता. अनेक प्रकरणात लोक फिर्याद देण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे त्याच्याविरोधात एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक रवी सानप यांनी अधीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.