आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेत्रदान चळवळीत दहा वर्षांत चांगले काम करणाऱ्या बीड जिल्हा रुग्णालयात परवाना नूतनीकरणाअभावी चार महिन्यांपासून एकही नेत्रसंकलन होऊ शकलेले नाही. संचालक कार्यालयाकडून हे परवाना नूतनीकरण होते. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाकडून याचा पाठपुरावा सुरू असला तरी त्याला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नेत्रदान चळवळ थंडावली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात सुमारे दहा वर्षांपासून नेत्रसंकलन करण्यात येते. नेत्रदानाबाबत झालेली जनजागृती, समुपदेशक, रुग्णालय चौकीतील पोलिस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणावर नेत्रदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येते. यामुळेच मागील काही वर्षांत बीड जिल्हा नेत्रदानाच्या बाबतीत राज्यात अव्वल ठरला आहे. कोविडच्या दोन वर्षांच्या काळात नेत्रसंकलन केंद्राची तपासणी उपसंचालक कार्यालयाकडून झाली नव्हती. मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या नेत्रसंकलन केंद्राचा परवान्याची मुदत संपल्याचे डिसेंबरमध्ये झालेल्या उपसंचालक कार्यालयाच्या निदर्शनास आले होते.
त्यामुळे परवाना नूतनीकरण होईपर्यंत नेत्रसंकलन न करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे जानेवारीपासून जिल्हा रुग्णालयातील नेत्रसंकलन बंद आहे. चार महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप नेत्र संकलन केंद्राच्या परवान्याचे संचालक कार्यालयाकडून नूतनीकरण न झाल्याने नेत्रदान चळवळीला ब्रेक लागला आहे. काही नागरिकांची इच्छा असूनही त्यांना नेत्रदान करता येत नसल्याची स्थिती आहे
४०४ डोळ्यांचे संकलन : जिल्हा रुग्णालयाच्या अवयवदान विभागात सी. एस. गुरव या समुपदेशक म्हणून काम करतात. अपघातात मृत व्यक्ती, आत्महत्या केलेल्या व्यक्ती किंवा नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना गुरव या समुपदेशन करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.