आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापन दिनानिमित्त मनसे जालना तालुक्याच्या वतीने डुकरी पिंपरी येथे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात ८८७ नागरीकाची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१० रूग्ण मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असल्याची माहीती आयोजक तथा मनसे तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे यांनी दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांच्यासह मान्यवरांनी मनसेचे समाजाप्रती कार्य हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचाही सत्कार करण्यात आला.
शिबीराचे जिल्हाध्यक्ष उदघाटन गजानन गिते यांनी केले. यावेळी स पोनि योगेश धोंडे, नित्यानंद उबाळे, कृष्णा पिसोरे, हरिदास लांडे, मच्छिंद्र चव्हाण, रोहित व्यवहारे, नागेश वाघमारे, सोमेश कुरेवाड, ऋषिकेश शीलवंत, दिगंबर राऊत, ओमकार गवळी, राम कातकडे, हरीओम शिरसागर, राहुल पवार, विशाल जोरावर, तेजस आत्तमवाढ, गौरव सहाने, संतोष राऊत, विजय देशमुख, ज्ञानेश्वर हजारे, अनंता राऊत, शिवाजी मगर, सरपंच बाळासाहेब चौधरी, सोपान घाटे, हरी राऊत, कैलास जाधव, कैलास तांगडे, विठ्ठल डुकरे, गजानन मगर, हरी लोंढे, मोहीन शेख, कृष्णा काटकर, अरबाज आदी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.