आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोयीस्कर बदलीसाठी स्वत: किंवा नातेवाइकांचे बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणाऱ्या बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी ५२ जणांना निलंबित केल्यानंतर बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील अहवालानंतर २६ शिक्षकांना निलंबित करण्यात आले. यामुळे बनावट प्रमाणपत्र घोटाळ्यातील निलंबित शिक्षकांचा आकडा ७८ इतका झाला आहे. आणखी २३ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित आहेत. बीड जिल्हा परिषदेत सध्या शिक्षकांच्या बदलीची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. बदलीपात्र शिक्षकांना अर्ज करण्यासाठी दोन संवर्ग आहेत. यातील संवर्ग एक मधील दिव्यांग तरतुदीमधील सहानुभूतीचा गैरफायदा घेत जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र देऊन बदलीसाठी अर्ज केला होता.
२३६ शिक्षकांची तपासणी
तक्रारीनंतर ३३६ पैकी २३६ शिक्षकांची स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिकल बोर्डाकडून फेरतपासणी केली होती. यात पहिल्या टप्प्यात ५२ शिक्षकांच्या दिव्यांगत्व टक्केवारीत तफावत होती त्यांना निलंबित केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.