आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरराज्यातील वाहनांची अस्तित्वात नसलेले चेसिस नंबर टाकून बीडमध्ये १९ वाहनांची बनावट नोंदणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच महिन्यांच्या काळात अतिरिक्त पदभार असताना श्रीकृष्ण नकाते याने हा प्रताप केला. दरम्यान यातील तब्बल १६ वाहनांवर विविध बँका, खासगी फायनान्स कंपन्याचे ३ कोटींचे कर्ज आहे. श्रीकृष्ण नकातेने यापूर्वीही औरंगाबादेत कार्यरत असताना अशाच प्रकारचा कारनामा केला होता तेंव्हाही गुन्हा नोंद झाला होता.
बीड येथील उपप्रादेशीक परिवहन अधिकारी कार्यालयातून जुलै ते नोव्हेंबर २०१७ या काळात टाटा मोटर्सच्या १९ मालवाहू वाहनांची नोंदणी केली होती मात्र ही नोंदणी करताना बनावट चेसिस नंबर वापरले गेल्याची बाब समोर आली होती. परराज्यातील वाहनांचे चेसीस नंबर बदलून ही नोंदणी केली गेली होती. यासाठी परिवहन विभागाने टाटा मोटर्सला दोन वेळा पत्र व्यवहार करुन त्यांच्याकडून या वाहनांची माहिती मागवली होती मात्र, बीडमध्ये नोंदवलेल्या १९ वाहनांचे चेसीस नंबर बनावट असल्याचे टाटा मोटर्सने स्पष्ट केले होते.
तत्कालीन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते याने हा सर्व कारनामा केला हाेता. या प्रकरणी राज्याचे परिवन उपायुक्त संजय मेत्रेवार यांनी बीडच्या आरटीओंना पत्र पाठवून गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. गुुरुवारी रात्री याप्रकरणी तत्कालीन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकातेवर फसवणूकीचा गुन्हा नोंदवला गेला आहे. दरम्यान, श्रीकृष्ण नकाते हा यापूर्वीही वादग्रस्त राहिलेला असून औरंगाबादेत तो कार्यरत असताना त्याने अशाच प्रकारे बनावट नोंदणी केली होती.
नोंदणी प्रक्रियेला फाटा दरम्यान, ही बनवाबनवी करताना वाहन नोंदणीची ही नियमित प्रक्रिया असते त्याला फाटा देण्यात आल्याचे समोर आले. श्रीकृष्ण नकातेने सर्व टप्प्यांची प्रक्रिया एकट्याच्याच लॉगीन इन वरुन केली होती शिवाय, नोंदणीनंतर ते कागदपत्रही गायब केले गेले आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले गेले होते.
दरम्यान, श्रीकृष्ण नकातेने केवळ बनावट नोंदणी केली असून या सर्व प्रक्रियेत मोठे रॅकेट सक्रिय आहे. परराज्यातून वाहने आणून त्या वाहनांवर कर्ज घेऊन, त्याची विक्री केली जात आहे. यासाठी नकाते सारखे अधिकारी हाताशी धरुन रॅकेट चालवले जाते. सध्या तरी केवळ नकातेवर गुन्हा नोंद असून या तपासात हे सर्व रॅकेत शोधणे आता पोलिसांसमोर आव्हान आहे.
पथक रवाना केले आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने शुक्रवारी काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. ज्याआधारे नकातेला अटक करण्यात येईल. अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहे. यामध्ये आणखी कोण काेण सहभागी आहेत याचाही शोध घेतला जात आहे. प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला जाईल. - संतोष साबळे, पोलिस निरीक्षक, बीड ग्रामीण ठाणे
३ कोटींची कर्ज वसूली कशी? दरम्यान, १९ पैकी १६ वाहनांवर आयसीआयसीआय, सुंदरम्, टाटा मोटर्स, आयकेएफ, एचडीबी, इंडसंड, श्रीराम, टीव्हीएस, इक्वाटीस यासह अन्य काही खासगी फायनान्स कंपन्यांचे व बँकांचे ३ कोटी रुपयांचे कर्ज आहे. दरम्यान, यातील थकीत कर्जाचे पुढे काय होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे कर्ज देणाऱ्या या संस्थाही अडचणीत आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.