आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेक:मुलाच्या आत्महत्येची खोटी माहिती; पोलिसांवर दगडफेक

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाने आत्महत्या केलीये घरी चला, असे म्हणत पोलिस ठाण्यात आलेल्या वडिलांनी पोलिस कर्मचाऱ्यांना घरी नेले आणि त्यानंतर पोलिसांवरच दगडफेक केली. ही घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील गणेशनगरमध्ये घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी सुनील अलगट यांनी याप्रकरणी तलवाडा पाेलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, ते शनिवारी तलवाडा ठाण्यात नियमित कामकाज करत असताना दशरथ मारुती पवार हे ठाण्यात आले. माझ्या मुलाने आत्महत्या केली आहे घरी या असे त्यांनी सांगितले. गांभीर्य ओळखून अलगट हे एका सहकाऱ्यासह पवार यांच्या गणेशनगरमधील घरी गेले.

मात्र, त्या ठिकाणी कुणीही आत्महत्या केली नव्हती. खोटी माहिती का दिली याचा जाब विचारताच दशरथ मारुती पवार, शांताबाई दशरथ पवार, राणी युवराज पवार आणि विलास दशरथ पवार यांनी अलगट आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दगडफेक केली. या प्रकरणी चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा नोंदवला गेला.

बातम्या आणखी आहेत...