आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:शेतीच्या वादातून दौलतवाडीत कुटुंबाला मारहाण; बारा जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातून पाणतास काढून देण्याच्या वादातून पाटोदा तालुक्यातील दौलतवाडीत शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात १२ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी कल्पना गोकुळ पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, शेतातून पाणतास काढून देण्याच्या कारणावरून गावातीलच शिवाजी विठोबा पवार, दिनकर विठोबा पवार, सत्यभामा विठोबा पवार, शिमिंता दिनकर पवार, अशोक शिवाजी पवार, जया अशोक पवार, राम दिनकर पवार, वैशाली राम पवार, बळी दिनकर पवार, सरस्वती बळी पवार, चांगदेव शिवाजी पवार, अंजली चांगदेव पवार यांनी कल्पना यांच्या कुटुंबीयांशी २ जून रोजी वाद घातला. कुऱ्हाड, लाकडी दांडा, बेल्टने मारहाण केली.

डोळ्यात चटणी टाकून कल्पना यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण झाली. याप्रकरणी बारा जणांवर अमळनेर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...