आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप:वरुणराजाच्या साक्षीने मयूरेश्वर गणेशाला लिंबागणेशात निरोप

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लिंबागणेश येथे एक गाव एक गणपतीची परंपरा असलेल्या मयूरेश्वर गणेशाची विसर्जन मिरवणूक सोमवारी दुपारी एक वाजता गावातील सरकारवाडा येथून महाआरतीने सुरू झाली.

पालखीत विराजमान झालेल्या मयूरेश्वर गणेशाची छत्री, चौरी, अब्दागिरी, ध्वज, दंड अशा राजेशाही थाटात पावसात मिरवणूक सुरू झाली. पालखी समोर भजनीमंडळ व लेझीम पथक सहभागी झाले होते. गावातील मारुती मंदिराच्या परिसरातून ही पालखी बाजारस्थळी एका बैलगाडीवर भाविकांच्या दर्शनासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती.

चंद्रपुष्कर्णी तीर्थात विसर्जन
लिंबागणेश येथील बाजारस्थळी दुपारी बारा वाड्यांतील गणेश भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या मयूरेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी महिला व पुरुष गणेश भक्तांची एकच गर्दी झाली होती. या शिवाय गावात यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेसहा वाजता पुन्हा बाजारस्थळापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन आठ वाजता भालचंद्र गणपती मंदिराजवळील चंद्रपुष्करणी तीर्थात वरुणराजाच्या साक्षीने शांततेत विजर्सन करण्यात आले. परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

राजकीय नेते झाले पालखीचे भोई
लिंबागणेशमध्ये मयूरेश्वर गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सरपंच स्वप्निल गलधर, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी पालखीला खांदा देऊन गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले.

बातम्या आणखी आहेत...