आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातील नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे ? या विचाराने चिंताग्रस्त बनलेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गांजपूर (ता. धारूर) येथे घडली.

गांजपूर (ता. धारूर) येथील रघुनाथ विठोबा आगे (५५) यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा धारूर या शाखेतून कर्ज घेतले. याशिवाय नातेवाईकाकांडून हात उसने पैसे ही घेतले होते. मात्र अतिवृष्टीमुळे शेती नापीक बनल्याने बँकेचे कर्ज आणि नातेवाईकाकांचे घेतलेले पैसे कसे फेडायचे ? या विचाराने ते मागील १५ दिवसांपासून चिंताग्रस्त बनले होते.

शेवटी कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाची भूमिका घेत कापूस फवारणीसाठी घरात आणून ठेवलेले विषारी औषध त्यांनी प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी त्यांना मृत घोषित केले. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास घडली.

बातम्या आणखी आहेत...