आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलाला जगवताना बळीराजा गतप्राण:वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू; सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील घटना

सिल्लोड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड तालुक्यातील सावखेडा (वाडी) येथे शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 11) शेतात दुपारी घडली.

तालुक्यातील सावखेडा (वाडी) येथील गट क्रमांक 292 मध्ये आपल्या शेतात शेतकरी संजय नत्थू उटाडे (वय 45) जनावरांना चारा पाणी करीत असताना शनिवार (ता. 11) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडले. त्यांचे चुलत भाऊ व इतर नातेवाईकांनी त्यांना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच तलाठी एस. एम. इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून महसूल प्रशासनाकडे अहवाल सादर केला. या घटनेची सिल्लोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेण्यात आली असून पोलीस शिपाई भागिनाथ वाघ, विष्णू कोल्हे, विजय पवार हे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...