आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन वार:महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा, शहरातील पाणीप्रश्नी रिपाइं आक्रमक; राज्य सरकार दखल घेत नसल्याने शेतकरी, कार्यकर्ते, नागरिकांचे आंदोलन

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीची कामे सुरू आहेत, पाणी उपलब्ध आहे. परंतु महावितरणकडून विद्युत पुरवठा होत नसल्याने शेताला पाणी देता येत नाही. त्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या विरेधात विभागीय कार्यालय येथे आक्रोश मोर्चा काढला. बीड शहरातही पाणी नियमित मिळत नसल्याने रिपाइंच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. वारंवार मागण्यांसाठी आंदोलने करूनही राज्य शासनाकडून दखल घेतली जात नसल्यने बीड जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले, तर शासकीय कार्यालयांमध्ये पिण्यासाठी पाणी नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिंबू-सरबत वाटप गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

महावितरण कार्यालयात मोर्चा
बीड | महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून अधीक्षक अभियंता महावितरण यांच्या कार्यालयासमोर सात गावांतील शेतकऱ्यांनी राजेंद्र आमटे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. खांडेपारगाव परिसरातील खांडेपारगाव, नागापूर (खुर्द), उमरी, नागपूर बुद्रुक, उम्रद खालसा, अंथरवन प्रिंपी, अंथरवन पिंप्री तांडा येथील शेतकऱ्यांचा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात यावा, नवीन सबस्टेशन व १९७२ च्या जुन्या तारा बदलण्यात याव्या या मागणीसाठी शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने अधीक्षक अभियंता महावितरण बीड यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

पाणीप्रश्नी रिपाइं आक्रमक
बीड | उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे असताना मात्र बीड नगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन होताना दिसून येत नाही. परिणामी नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. शहराला एक-एक महिना पाणी मिळत नाही.

पिण्याचे पाणी हा अत्यंत गरजेचा प्रश्न आहे. त्यामुळे बीड पालिका राज्यकर्ते आणि प्रशासनाने झोपेचे सोंग घेऊ नये. तुमची नौटंकी बाजूला सारून बीड नगरपालिकेने आधी पाण्याची सोय करावी, अशी मागणी घेऊन रिपाइंने सोमवारी बीड पालिकेच्या दारात आंदोलन करून पाणीप्रश्नी आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी नगरपालिका प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. या आंदोलनात रिपाइं कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...