आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलसमाेर आंदोलन:अग्रीम नुकसान भरपाईतून नऊ महसुली मंडळे वगळल्याने शेतकऱ्यांत संताप

केज22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हनुमंत पिंपरी महसूल मंडळ सोडता इतर नऊ महसूल मंडळे ही २५ टक्के पीक विमा अग्रीम नुकसान भरपाईतून वगळण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी दि. १२ रोजी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट असणाऱ्या महसूल मंडळांत २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय संयुक्त समितीमार्फत ९ सप्टेंबर रोजी काढण्यात आली. यात जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांपैकी केवळ १६ महसूल मंडळांतच सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट दाखवण्यात आली आहे. तालुक्यातील हनुमंत पिंपरी महसूल मंडळ सोडता केज, बनसारोळा, युसूफवडगाव, होळ, चिंचोली माळी, आडस, विडा, नांदूरघाट, मस्साजोग ही मंडळे वगळण्यात आली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.आंदोलनात तालुकाध्यक्ष अमोल थोरात, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अतुल गवळी, शहराध्यक्ष फिरोज पठाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, सुग्रीव करपे, धीरज सूर्यवंशी, किरण चाळक, पिनू गोरे, शरद इंगळे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...