आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरी नेते तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराईत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ११ जून रोजी सकाळी ११ वाजता र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या शेजारील सिंधी हॉल भवन येथे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्या परिसंवाद व शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महेश बेदरे यांच्या पुढाकाराने गेवराईत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कशा पध्दतीने हवामानाधारित बियाणे लागवड करावी, वर्षभरातील पावसाचे हवामान अंदाज या संदर्भात पंजाबराव डख हे सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपजिल्हाध्यक्ष तथा नियोजन समितीचे सदस्य राहुल सोनवणे, कृषी उद्यान पंडित राजेंद्र आतकरे, शेतकरी संघटनेच्या युवती अध्यक्षा पूजा मोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे काँग्रेस तालुका अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंजाबराव डख यांच्या मार्गदर्शनासह या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनचे मोफत बियाणे वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेश बेदरे, मधुकर वारे, सोपानराव टेकाळे, मुकुंद खेत्रे, मनोहर चाळक, अंकुश पाचपुते आदींनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.