आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगामाचा भरलेला पीक विमा, ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचे झालेले नुकसान त्यामुळे घटलेले ६० टक्के उत्पादन, सप्टेंबर महिन्यातील अतीवृष्टीत १३१ टक्क्याची नोंद या मुळे ७० हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने बुधवारी सकाळी अकरा वाजता गेवराई तहसिल कार्यालयासमोर डॉ.उद्धव घोडके यांच्या नेतृत्वाखाली खाली ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. खरीप २०२२ चा पीक विमा भरपाई देताना झालेला अन्याय दूर करा, अतिवृष्टी अनुदान तात्काळ द्या, खरीप २०२० पीकविमा बाबत प्रधान सचिवाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, खरीप २०२३ पासून पीक विमा योजना बंद करा यासह विविध मागण्यासाठी शेतकरी पुत्र फाउंडेशनच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश बेदरे, बंडू यादव, रघुनाथ नावडे, राजेंद्र धोत्रे, मोहन यादव, सुदाम भोपळे, महारुद्र खुणे, बंडू सुगडे, भगवान काळे, दत्ता साखरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब आतकरे, आत्माराम भिताडे, डॉ.तुळशीराम खोटे, कचरू बापू पवार, दत्ताभाऊ हत्ते, रंगनाथ यादव, ज्ञानेश्वर लाड, प्रकाश पऱ्हाड, संभाजी कोकणे, बद्रीनारायण पांगरे, आदी शेतकरी सहभागी झालेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.