आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:कापसाला बारा हजार रुपये भाव देत शेतकऱ्यांचा सन्मान; कापुस घेऊन आलेले अनेक शेतकरी, वाहन चालक उपस्थित

दिंद्रुड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील परिसरातील फकीरजवळा येथील श्री बालाजी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीने कापसाला काल शनिवार (दि.२६) रोजी बारा हजार सहा रुपये प्रतिक्विंटल भाव देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला. या वर्षी कापूस पिकाच्या उत्पादनात आलेली घट लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी हा भाव देण्यात आला.

धारूर तालुक्यातील फकीरजवळा येथील बालाजी जिनिंगने शेतकऱ्यांना चांगला भाव व सुविधा देऊन जिनिंगमध्ये चांगली आवक मिळवली आहे. काल रोजी कापसाला मिळालेल्या भावाबद्दल शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. शेतकरी उमेश रुपनर बोधेगाव, सूर्यकांत जायभाये कुंडी, विक्रम साखरे रुई, रंगनाथ भोसले रुई, राजेभाऊ घानवडकर कुंडी, संतोष नांदुरे रुई या कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा श्री बालाजी जिनिंग अंड प्रेसिंग च्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.

आम्हीही शेतकरीच आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे ; त्यांचा सन्मान झाला पाहिजे ; त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे, या उद्देशाने हा जास्तीचा चांगला भाव देऊन शेतकऱ्यांचा सत्कार केल्याचे मत या जिनिंगचे मालक- चालक प्रदीप विठ्ठल ठोंबरे व विठ्ठल माने यांनी या सत्कारप्रसंगी व्यक्त केले. यावेळी ग्रेडर अशोक जाधव ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मापाडी हरिभाऊ गवळी व अशोक डोने आदींची उपस्थिती होती. अंकुश ठोंबरे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी कापुस घेऊन आलेले अनेक शेतकरी, वाहन चालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...