आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाचे धरणे:बाजार समितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे धरणे

माजलगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी बाजार समितीत धरणे आंदोलन करण्यात आले. माजलगाव बाजार समिती मराठवाड्यात नावाजलेली बाजार समिती असून तिचे उत्पन्न चांगले आहे परंतु शेतकऱ्यांसाठी शौचालय, ये-जा करण्यासाठी कृषी रथ, मोठे विजेचे फोकस, मालाच्या संरक्षणासाठी वॉचमन या सुविधानाही. कृषी रथ म्हणून असलेली बस वापरा अभावी धूळ खात पडलेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेले सोयाबीनचे पोते चक्क रस्त्यावर टाकलेले असून त्यासाठी बाजार समितीकडून त्याला संरक्षण देण्यासाठी वॉचमन व चांगल्या उजेडाची सुविधा अद्याप दिली जात नाही.

एक रुपयात शेतकऱ्यास जेवण ही सुविधा फक्त नावालाच उरलेली आहे. हजारो शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसभरात व्यवहार करतात परंतु आसन व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे केवळ शंभर लोकांना एक रुपयात जेवण दिले जाते, म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी साडेबारा वाजता शेतकरी कामगार पक्षाचे नेते नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन करून घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी प्रशासनाविरुद्ध् घोषणाबाजी करून शेतकऱ्यांच्या सुविधांकडे लक्ष वेधले.

या आंदोलनात मुंजा पांचाळ, विष्णू शेळके, लक्ष्मण बादाडे, लक्ष्मण पितळे,सतिष रिंगणे, बळीराम कदम, सुभाष मायकर, व्यंकट गिरी, ज्ञानदीप गोले, भाऊसाहेब गोळेकर, बाबासाहेब गोळेकर, अप्पासाहेब कोरडे, बाबासाहेब कोरडे, चांगदेव शेजुळ, मनोहर माने, संतोष बादाडे, पांडुरंग वैद्य,राजेभाऊ शेरकर, मुकेश शेरकर, समाधान शेरकर,लखन सोळंके यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...