आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र डिघोळअंबा येथे गरीब कल्याण संमेलन व खरीप हंगाम शेतकरी मेळावा झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर उद्घाटक म्हणून नंदकिशोर मुंदडा यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक डॉ. उपेंद्र कुलकर्णी, परळीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. नितीन धर्मराव व डॉ. वसंत देशमुख यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक उद्यानविद्या शास्त्रज्ञ नरेंद्र जोशी यांनी केले. उद्घाटनपर मार्गदर्शन करताना मुंदडा म्हणाले, कृषी विज्ञान केंद्राच्या मेळाव्याला शेतकरी शेतीचे ज्ञान व तंत्रज्ञान घेण्यासाठी येतात. केंद्राच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन पिके घेत आहेत. जिल्ह्यातील तरुण शेतकरी रेशीम शेतीच्या माध्यमातून प्रगती करीत आहेत.
शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र सदैव सक्रिय आहे. शेतीच्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. डॉ. देशमुख यांनी वातावरण बदलास अनुकूल शेती पद्धतीचे तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी विशिष्ठ एकाच वाणाचा आग्रह धरू नये.
शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून बियाणे उत्पादनाचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. सूर्यवंशी यांनी सोयाबीन वाणाची निवड करताना वाणांची वैशिष्टे, उगवण क्षमता तपासून पेरणी करावी. रुंद वरंबा-सरी तंत्रज्ञानाचा वापर करावा. योग्य खोलीवर बियाणे पडले पाहिजे असे सांगितले.अध्यक्षीय समारोप करताना डॉ. कुलकर्णी यांनी मेळाव्यात तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.