आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणी:खरिपपुर्व मशागत करुन शेतकरी पेरणीस सज्ज; शेत मशागतीत इंधन दरवाढीने फटका

टाकरवण16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकरवण परीसरात खरिपपुर्व मशागत करुन शेतकरी पेरणीस सज्ज झाला आहे. इंधनाच्या महागाईने मशागत करताना शेतकऱ्यांना चांगलीच झळ बसली आहे तर खत, बी-बियाणांच्या महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. मशागत अंतिम टप्प्यात असून शेतकरी बी बियाणे खरेदी करत आहेत. यावरुन राजाच्या आगमची शेतकरी वाट बघत असल्याचे चित्र दिसत आहे.

टाकरवण परिसरात ऊसाचे क्षेत्र अधिक असले तरी शिल्लक क्षेत्रावर कापुस, सोयाबीन, तुर लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहेत. शेतकऱ्यांनी रुटर नांगरणी, वखरणी, काड्याकुड्या वेचून शेत पेरणी योग्य केले आहे.वरूणराजाचे आगमन होताच शेतकरी पेरणीस सुरुवात करणार आहेत. इंधनाच्या महागाईमुळे यंत्राने शेतमशागत करतांना शेतकऱ्यांना यंदा मोठी झळ बसली आहे. यासोबतच खते, बी, बियाणाचा दरवाढीने यंदा पेरणीचा खर्च वाढला आहे.

टाकरवण परीसरातील शेतकरी यंदा अतिरिक्त ऊस प्रश्नाने अडचणीत सापडले होते. त्यातच बळीराजाने आता खरीपाची तयारी केली आहे. याबाबत बोलताना शेतकरी चंद्रकांत शिंदे म्हणाले, ‘बी, बियाणे, खत यंदा महागले. पेरणीचा खर्च वाढनार आहे. ट्रॅक्टरने मशागत केली पण नांगरटीचे पाळीचे व रुटरचे भाव वाढल्याने यंदा शिवार नीट करायला जास्त खर्च लागला आहे.’दरम्यान, टाकरवण परिसरात यंदा शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल आहे. पूर्वीपासूनच टाकरवण परिसर कपाशीचा बेल्ट म्हणून ओळखला जातो. त्यात गतवर्षी मिळालेल्या चांगल्या दरामुळे कापूस लागवडीकडे कल दिसून येत आहे. बियाणे खरेदी करताना विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध वाणांपैकी चांगल्या वाणाची निवड करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले.

बातम्या आणखी आहेत...