आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्थापन:शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करावे : येळीकर

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कृषी क्षेत्राला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी कृषी विभागामार्फत आयोजीत राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात केले.

गतवर्षी कापसावर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते तशी परिस्थिती या वर्षी होऊ नये याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी सहाय्यक नितीन पाटील यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन शेतीशाळेचे आयोजन केवड व हनुमंत पिंप्री येथे केले होते. या शेतीशाळेमध्ये येळकर यांनी शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशकांचा व खतांचा बेसुमार वापर केल्यामुळे उत्पादन खर्चा मध्ये होत असलेली वाढ आणि कृषी परिसंस्थेचा होत असलेला ऱ्हास विस्तृतपणे समजावून सांगितला. उत्पादन खर्च कमी करून कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

घरच्या घरी चिकट सापळे तयार करून शेतामध्ये लावल्यास त्यापासून रस शोषक किडींचा बंदोबस्त करता येईल याची माहिती दिली. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाच्या बायोमिक्सचा वापर करून जिवाणू स्लरी तयार करून पिकांना देण्यासंदर्भात माहिती दिली. फवारणी करताना घ्यावयाची काळजी संदर्भात विस्तृतपणे माहिती देऊन सुरक्षित किटचा वापर करून फवारणी प्रात्यक्षिक दाखवले. कापूस मूल्य साखळीची माहिती देऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणी संदर्भात मार्गदर्शन केले. दीपक दळवी यांनी कामगंध सापळे लावण्याचे प्रशिक्षण दाखवले. कृषी सहाय्यक नितीन पाटील, कमलाकर राऊत, ज्ञानेश्वर जाधव यांनी कामगंध सापळे इमामेक्टिन बेंजोएट निंबोळी अर्क निविष्ठा वाटप केल्या.

अशा पद्धतीने करता येईल आर्थिक नुकसानीचे सर्वेक्षण
दर आठवड्याला शेताचे प्रतिनिधित्व करतील अशा २०ओळी निवडाव्यात, प्रत्येक ओळीतील एक अशी २० बोंडे किंवा फुलांची निरीक्षणे घ्यावीत त्यापैकी २ बोंडांत किंवा फुलांत गुलाबी बोंडअळी आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची संकेत पातळी समजून रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा असे शिवप्रसाद येळीकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...