आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:पीएम आवास योजनेच्या हप्त्यासाठी उपोषण; आश्वासनानंतर घेतले मागे

धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक दिवसांपासून पंतप्रधान आवास योजनेचा शेवटचा हप्ता मागणी करूनही मिळत नसल्याने लाभार्थींकडून बुधवारी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेऊन नगर परिषद प्रशासनाकडून आठ दिवसांत लाभार्थींचा राहिलेला शेवटचा ५० हजारांचा हप्ता आठ दिवसांत देण्याचे लेखी आश्वासन नगर परिषदेच्या वतीने दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

धारूर नगर परिषदेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थीचे दीड वर्ष काम पूर्ण होऊन उलटले असताना अनेक वेळा मागण्या करून व उपोषण करूनही लाभार्थींना या योजनेतील शेवटचा ५० हजार रुपयांचा हप्ता मिळाला नाही.

त्यामुळे उपोषणकर्त्यांकडून बुधवारी नगर परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणाची तीव्रता लक्षात घेता नगर परिषद प्रशासनाकडून तत्काळ दखल घेऊन आठ दिवसांत ज्या लाभार्थींचा शेवटचा हप्ता राहिला असेल, अशांना ५० हजार रुपयांचा हप्ता देण्यात येईल, असे लेखी आश्वासन परिषद प्रशासनाकडून दिल्यानंतर लाभार्थींकडून उपोषण मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...