आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाळाटाळ‎:सरपंचासह नागरिकांचे उपोषण‎

केज‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जानेगाव (ता. केज) येथील गावठाण हद्दीतील‎ जळालेले विद्युत रोहित्र दुरुस्त करून गावात‎ आणून ठेवले आहे. मात्र, ते बसवून विद्युत‎ पुरवठा सुरळीत करण्यास महावितरणकडून‎ टाळाटाळ होत असल्यावरून सरपंचासह‎ नागरिकांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर‎ आमरण उपोषण सुरू केले आहे.‎ जानेगानला विद्युत पुरवठा करणारा गावठाण‎ हद्दीतील विद्युत डीपी १ महिन्यापुर्वी जळाला‎ होता. गावकऱ्यांनी पाठपुरावा करून डीपीची‎ दुरुस्ती करून घेतली. दुरुस्त केलेला डीपी हा‎ गावातील खंडोबा मंदिरात आणून ठेवला. मात्र‎ १५ ते २० दिवसांचा कालावधी लोटून ही‎ सदरील डीपी बसवून कार्यान्वित करण्यासाठी‎ महावितरण कंपनीचे संबंधित टाळाटाळ करीत‎ असल्याने गावात महिनाभरापासून अंधार‎ असून गावातील पाणी पुरवठ्याची साधने बंद‎ पडली आहेत.

इतर जीवनावश्यक वस्तू ही‎ विजेअभावी बंद असून नागरिकांची गैरसोय‎ होत आहे. याची दखल घेऊन त्वरित डीपी‎ बसवून कार्यान्वित करून विद्युत पुरवठा‎ सुरळीत करावा. अन्यथा २ मार्च रोजी तहसील‎ कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू असा‎ इशारा ग्रामपंचायतीचे सरपंच आम्रपाली‎ विलास ओव्हाळ, उपसरपंच युवराज पाटील,‎ सतीश शिंदे, माजी सरपंच अंबादास शिंदे‎ यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदारांना लेखी‎ निवेदनाद्वारे दिला होता.‎

बातम्या आणखी आहेत...