आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठ दिवसांपासून औष्णिक वीज निर्मिती कंपनीला जमीन दिलेले प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर झाली आहे. वीज निर्मिती कंपनी आणि प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्याने प्रशासनाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप करून प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्यांसाठी आता निर्णायक लढा लढविणार असुन याच्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुधीर फड यांनी दिला आहे.
आम्ही जमिनी दिल्या तेंव्हा आम्हाला भरभरून आश्वासनं दिली पण आता आमची वाईट आवस्था केलीय. आठ दिवस झाले आम्ही आमच्या रास्त मागण्यांसाठी उपोषणाला बसलो आहोत पण सरकार आणि वीज निर्मिती कंपनी झोपेचे सोंग घेऊन बसली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत झोपेतून उठवण्यासाठी आता आक्रमक लढा लढावा लागेल काय असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
प्रकल्पग्रस्तांना कायम सेवेत सामावून घ्यावे, ४५ वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता ३० हजार रुपये करावा, चंद्रपूर पाॅवर स्टेशन येथे प्रकल्पग्रस्तांचे दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत या मागण्यांसाठी हे आमरण उपोषण असुन आहे. औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर २४ डिसेंबरपासून प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणाला बसले आहेत आठ दिवस उलटून गेले आहेत आणि उपोणार्थींपैकी तिघांची प्रकृती गंभीर झाली असुन त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा विज निर्मिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यापैकी कुणीही उपोषणार्थीची भेट घेतली नाही. न्यायासाठी एखाद्याचा बळी हवा आहे की काय असा सवाल करुन दोन दिवसात मागण्या मार्गी लागल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुधीर फड यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.