आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:सातबारा ऑनलाइन करून पीक विमा घेण्यासाठी उपोषण

प्रतिनिधी| माजलगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राह्मगाव येथील शेतकऱ्याच्या जमिनींच्या नोंदी ऑनलाइन न झाल्याने त्यांना ७ /१२ मिळत नाही. त्यामुळे बँक कर्ज देत नाही, पीक विमा भरता येत नाही व शासनाच्या शेतीविषयक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरुवारी माजलगाव तहसीलसमोर उपोषण केले.

लऊळ येथील बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही ब्रह्मगावच्या शिवारात आहे. मात्र, येथील संपूर्ण शिवार हा तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे ७/१२ ऑनलाइन नसल्याने अनेक वर्षांपासून पीक विमा, बँक कर्ज प्रकरणे आदी सुविधांपासून वंचित आहेत.शेतकऱ्यांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात चंद्रभान शिंदे, बाळासाहेब मुंडे, अशोकराव नरवडे पाटील, सुभाष घाडगे, राम मुंडे, गौतम मुंडे, संतोष घाडगे, कृष्णा घाडगे, कैलास गोस्वामी, विक्रम घाडगे, सिद्धेश्वर कुरे, देवानंद मुंडे आदी शेतकरी सहभागी आहेत.

बातम्या आणखी आहेत...