आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:केजमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषणत; तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले नागरिक

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भवानी मंदिरासमोरून सटवाई मंदिराकडे जाणाऱ्या शेतरस्त्यावर शेड उभे करून केलेले अतिक्रमण हटवण्यात यावे, या मागणीसाठी कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. केज शहरापासून जवळच असलेल्या भोसले वस्ती व कोल्हे वस्तीकडे जाणाऱ्या शेतरस्त्यावर सटवाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पत्र्याचे शेड ठोकून अतिक्रमण केले.

त्यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने हे अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी मोहन गुंड, शकील शेख, राजेभाऊ औटी, चंद्रकांत गुंड, अशोक रोडे, किसन गाडवे, पांडुरंग महाडिक, दत्ता शेटे, सुभाष कोल्हे, लिंबाजी सोनवणे, बंडू औटी, नारायण वळसे, सुधाकर पांचाळ, विष्णू वळसे, बाळासाहेब सत्त्वधर, अमोल औटी, शेख सोहिल, शकुंतला औटी, कोंडाबाई साळुंके, मीना औटी, रिजवाना शेख, सुरेखा महाडिक, सुवर्णमाला सोनवणे हे गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण बसलेत.

बातम्या आणखी आहेत...