आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड पुन्हा चर्चेत:वाळू माफियांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरने धडक दिल्याने पोलिस कर्मचारी जखमी

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील गेवराईच्या खामगावमध्ये वाळू माफियांनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला आहे. काही जण अवैध रित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी कारवाईसाठी गेलेल्रूा पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर टाकत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफीयांनी केला आहे. कारवाई का केली म्हणत पोलिस नाईक गणेश धनवडे यांच्या अंगावर ट्रॅक्टर टाकले. यावेळी ते जखमी झाले आहेत. खामगाव येथील गोदावरी नदी पात्राजवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 ट्रॅक्टर जप्त केले आहेत.

नेमके काय आहे प्रकरण
गोदावरी पात्रात वाळू उपसा होत आहे, अशी माहिती गेवराई ग्रामीण पोलिसांनी मिळाली, या प्रकरणी पोलिसांनी गोदापात्रात कारवाईसाठी धाड टाकली. यावेळी पोलिसांना गोदापात्रात 6 ट्रॅक्टर आणि काही जण वाळू उपसाकरत असल्याचे निदर्शणास आले. पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर जप्त करण्यास सुरूवात केली, यावेळी चिडलेल्या वाळू माफीयांनी पोलिसांची हुज्जत घालत पोलिस नाईक गणेश धनवडे यांच्या अंगावर ट्रॅक्टर टाकले. यात ते किरकोळ जखमी झाले असून त्यांना गेवराईच्या रूग्णालयात दाखल केले. सध्या पोलिस नाईकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

बीडमध्ये गुन्हेगारांचे वाढते प्रस्थ
बीडमध्ये महिला आमदारांनी मी स्व:त सुरक्षित नाही, तर बीडमध्ये महिला कशा सुरक्षित राहतील, असा आरोप करत बीडमधील वाढत्या गुन्हेगारीविरोधात अधिवेशनात आवाज उठवला होता. तर अनेकदा हाणामारीच्या घटना शहरात घडत असतात. यासाबेतच कधी महिलांची असुरक्षितता, वाळू माफीया आणि गुटखा माफीयांच्या वाढत्या भाईगिरीने जनता त्रस्त आहे असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी देखील केला होता. यामुळे बीडजिल्हा सध्या चर्चेत होता.

बीडमध्ये पोलिसांवर अनेकदा हल्ले
बीडमध्ये पोलिसांवर अनेकदा हल्ले झाले आहेत. वाळू माफियांनी सरकारी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर सरकारकडून अजून कोणतेही पाऊल उचले नाही. जिल्हाधिकारी, तहसिलदार अशा मोठ्या अधिकाऱ्यांवरती सुध्दा महाराष्ट्रात हल्ला झाला आहे. यामुळे आता पोलिस आणि प्रशासन वाळू माफियांवर कारवाई करणार का असा सवाल जनतेला पडला आहे.

बातम्या आणखी आहेत...