आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भाजीपाला विक्रीसाठी जाणारे पिता-पुत्र अपघातात ठार, दुचाकीला दिली कारने धडक

कडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चिचोंडी पाटील येथील आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी निघालेल्या दुचाकीला कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बापलेक ठार झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील पैठण-बारामती मार्गावरील खाकळवाडी शिवारात शुक्रवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. अरुण बापूराव औटे (५५) व सूरज अरुण औटे (२३, दोघे. रा. नांदा, ता. आष्टी) अशी मृत बापलेकांची नावे आहेत.

पैठण-बारामती मार्गावरील नांदा येथून अरुण बापूराव औटे आणि त्यांचा मुलगा सूरज अरुण औटे हे दोघे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता आष्टी तालुक्यातील कडामार्गे चिचोंडी पाटील येथील आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून जात होते. या मार्गावरील खाकळवाडी शिवारात त्यांची दुचाकी आली असता कडा येथून मिरजगावच्या दिशेने जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात औटे पिता-पुत्र जागीच ठार झाले. अपघाताची माहिती कळतात कडा चौकीचे पोलिस आणि कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील बापलेकाचे मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पितापुत्राच्या अपघाती निधनाने नांदा गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...