आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:सुनेच्या मानसिक त्रासाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या, सुनेसह आई-वडिलांवर गुन्हा दाखल

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुनेकडून होणारी बदनामी व मानसिक त्रासाला कंटाळून सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील इमामपूर येथे घडली. सासऱ्याच्या सुसाइड नोटवरून सुनेसह तिच्या आई, वडिलांविरोधात ८ दिवसांनंतर गुन्हा नोंद करण्यात आला. भास्कर अंबादास वडमारे (६१, रा. कागदी वेस, बीड) असे आत्महत्या केलेल्या सासऱ्याचे नाव आहे. ते निवृत्त सैनिक होते.

भास्कर यांची सून ज्योती अमोल वडमारे हिने महिला तक्रार निवारण केंद्रात पती व सासू-सासऱ्यांकडून आपला छळ होत असल्याबाबत तक्रार अर्ज दिलेला आहे. दरम्यान, सुनेकडून होत असलेले खोटे आरोप, बदनामी यामुळे भास्कर वडमारे यांना मानसिक त्रास होत होता. मात्र, सुनेकडून होणारी बदनामी थांबली नाही. ती असह्य झाल्याने भास्कर वडमारे यांनी २४ फेब्रुवारी रोजी इमामपूर शिवारातील खडी मशीन परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, या वेळी त्यांच्याजवळ एक सुसाइड नोट सापडली होती.

बातम्या आणखी आहेत...