आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:पाठलागाच्या भीतीने धरला आडमार्ग, दुचाकी पडली तलावात अन् दोघे गाठोडे घेऊन पसार; ‘त्या’ गाठोड्यात काय? पोलिस घेताहेत शोध

धारूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या पाठीमागे कोणीतरी लागले असल्याचे समजून दुचाकीवरून गाठोडे घेऊन राष्ट्रीय महामार्गावरून जाताना त्यांनी आड वळणाचा रस्ता धरला. परंतु हा रस्ता तलावाच्या पाण्यातून गेल्याने त्यांची दुचाकी तलावात गेली. हे पाहून दोघांनी दुचाकी तशीच तलावात सोडून गाठोडे घेऊन पळ काढला. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला. पोलिसांनी दुचाकी जप्त केली.

हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या काहींनी पाहिला. परंतु दोघेजण गाठोडे घेऊन पसार झाले. बघ्यांनी धारूर पोलिसांना माहिती दिल्यांनतर पोलिस घटनास्थळी आले त्यांनी तीन तास डोंगरामध्ये त्या दोघांचा शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत. ती दुचाकी पुणे जिल्ह्यातील आहे. ते दोघे घेऊन जात असल्याचे गाठोडे कशाचे? याबाबत पोलिस अधिक तपास करत असल्याचे पोलिस निरिक्षक व्ही. एस. आटोळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...