आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी फरार:छेडछाडीला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास,  अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगावातील घडला प्रकार

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्दापूर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा केला दाखल, शोध सुरू
रोडरोमिओकडून सतत होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १० मे रोजी अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगावात घडली. दीपाली रमेश लव्हारे (१७, रा. पट्टीवडगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आरोपी फरार आहे.

पट्टीवडगाव येथील रमेश लव्हारे हे एसटीमध्ये चालक म्हणून नोकरीला आहेत. सध्या ते पालघर येथे कार्यरत आहेत. त्यांच्या घराशेजारी अकबर बबन शेख हा तरुण राहतो. मागील काही दिवसांपासून तो लव्हारे यांची मुलगी दीपालीला त्रास देत होता. बारावीच्या परीक्षेनंतर दीपाली कॉम्प्युटर क्लासला जात-येत असताना वाटेत तिची छेड काढत वेडेवाकडे बोलत होता. हा प्रकार दीपालीने तिच्या आईला सांगितला होता.

दरम्यान, ६ मे रोजी दीपालीच्या वडिलांनी अकबरला बोलावून घेत मुलीला त्रास देऊ नको, असे बजावले होते. परंतु अकबरच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. उलट अकबरकडून दीपालीला त्रास देण्याचे प्रमाण वाढले होते. यानंतरही दीपालीने तिच्या आईला हा प्रकार सांगितला होता. तेव्हा आई सुमित्रा यांनी वडील आणि भाऊ आला की आपण मार्ग काढू, अशी तिची समजूत काढली.

गुन्हा दाखल होताच आरोपी फरार : या आत्महत्याप्रकरणी दिपीलीची आई सुमित्रा यांनी बर्दापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अकबर बबन शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याची माहिती मिळताच आरोपी अकबर हा फरार झाला असून अद्याप पोलिसांनी त्याला अटक केली नाही.

आई गोंधळाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर उचलले पाऊल
१० मे रोजी रात्री साडेआठ वाजता दीपालीची आई गावातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेली होती. घरात कुणी नसल्याचे पाहून दीपालीने घराच्या माळवदाच्या आडूला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ११ वाजता तिची आई घरी पोहोचल्यांनतर ही घटना समोर आली. नातेवाइकांच्या मदतीने दीपालीला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात डॉक्टरांनी तपासणी करून दीपालीला मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...