आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई तालुक्यात सध्या रोजगार हमी योजनेच्या कामाची खिरापत सुरु आहे. यासाठी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर अपहार होत असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विविध विकास कामाची फाईल पुढे सरकावयाची असेल तर हजार रुपये मोजावे लागतात. पैसे घेऊन रांगेत उभे असलेला गेवराईच्या पंचायत समिती मधील एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्हा प्रशासनाचे लक्तरे वेशीला टांगले आहेत.
या प्रकरणी वरीष्ठांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गेवराई तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात मोठा गैरव्यवहार होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. मागील महिन्तच दोन वर्षापूर्वी मयत झालेल्या दोन व्यक्ती रेवकी देवकी येथील एका कामावर हजेरी लावत असल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असतानाच शनिवारी पंचायत समितीतील एका व्हायरल व्हिडीओने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली असून तालुक्यात रोजगार हमीच्या कामात अफरातफर होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
येथील रोजगार हमी विभागाचे लिपीत आर.पी.देशमुख हे विविध विकास कामाची फाईल पुढे सरकावयाची असेल तर प्रत्येकी १ हजार रुपयाची मागणी करत असल्याचे दिसून येते. पंचायत समितीच्या कार्यालयात कामांच्या मंजुरीसाठी ज्या विभागातून काम चालतं त्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये पैसे घेऊन रांगेत उभे असलेल्या या व्हिडीओत फाइल घेऊन आलेले लोक आणि या विभागाचे लिपिक आर.पी.देशमुख हे लिपिक कर्मचारी पैशाची मागणी करत असल्याचे दिसून येत आहे. अहवाल देण्याच्या बिडीओंना सूचना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रोहयोचे बीडीओ सचिन सानप यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले असून याबाबत गेवराईच्या गटविकास अधिकारी कांबळे यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना सानप यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.