आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण:नगर समाजातील मान्यवरांचा सत्कार सोहळा; अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नगर समाजातील मान्यवरांचा सत्कार सोहळा शिवसंग्रामने आयोजीत केला. या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सोहळ्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अभिनेत्री ईशा केसकर यांची उपस्थिती प्रमुख होती.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शिवसंग्रामने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्या दरम्यान व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे, ‘जयमल्हार’मालिकेतील अभिनेत्री ईशा केसकर, प्रभाकर कोलंगडे, नारायण काशीद, मनसेचे अशोक तावरे, जि.प. सदस्य बप्पासाहेब तळेकर, अनिल घुमरे, सुहास पाटील, राहील मस्के यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या धनगर समाजातील मान्यवरांचा हा सत्कार सोहळा संपन्न झाला. समाजातील विविध क्षेति काम करणार्‍या आणि यश संपादन करणार्‍यांचे सन्मान शिवसंग्रामने केला. या वेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र वेळेअभावी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आ. विनायक मेटे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

परिस्थितीची मांडणी करताना कोलंगडे म्हणाले की, ‘दरेकर साहेब, आम्ही मेटे साहेबांवर अन्याय झाला, असे म्हणणार नाही मात्र येणाऱ्या काळात मोठी संधी आहे, असे आम्ही म्हणूत, असे शिवसंग्रामचे माजी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासमोर आपल्या नेतृत्वाची व्यथा मांडली.

जय मल्हार मालिकेने मला जे प्रेम दिले ते कुठेही मिळाले नाही, हा कार्यक्रम नाट्यगृहात असल्याने मी सुरुवातीच्या काळात नाटके करायचे. नाटकांना अधिक प्राधान्य द्यायला हवे, हे सर्व कलाप्रेमी आणि नाट्यप्रेमी दिसून येतात, बीडमध्ये नाट्यकार्य शाळेचे आयोजन करावेत, असे अभिनेत्री ईशा केसकर म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...