आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीवाचक‎ शिवीगाळ:व्यसनमुक्ती केंद्रात महिला डाॅक्टरचा‎ विनयभंग; संचालिकेसह तिघांविरुद्ध गुन्हा‎

अंबाजोगाई‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यसनमुक्ती केंद्रात एका डॉक्टर महिलेस जातीवाचक‎ शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी केंद्राच्या‎ संचालिकेसह इतर दोघांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.‎ राजकुमार सोपान गवळे( रा. पाटोदा, जळकोट जि.‎ लातुर), अंजली बाबुराव पाटील (रा.वाघाळा), ओम‎ डोलारे (रा. अंबाजोगाई) अशी आरोपींची नावे आहेत.‎ पिडीतेच्या तक्रारीनुसार २२ फेब्रुवारी २०२२ रोजी निवासी‎ वैद्यकीय अधिकारी म्हणून नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात‎ नियुक्ती केली होती. ३ महिने काम करुनही केंद्राने केवळ‎ एका महिन्याचे वेतन दिले होते.

केंद्रातील दुसरे डॉ.‎ राजकुमार गवळे कामात हस्तक्षेप करुन त्रास देत होते तर,‎ ओम डोलारे हा एक्स्पायर झालेल्या गोळ्या रुग्णांना देतो‎ याबाबत त्याला जाब विचारल्याने तो अंगावर धावून‎ आला. ३१ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. गवळे याने‎ शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग केला. मोबाईल‎ हिसकावून घेतला. बळजबरीने झोपेचे इंजेक्शन देऊन‎ झोपी घातले. चुकीचे उपचार करुन मानसिक स्थिती‎ खराब केली. याबाबत केंद्र संचालक अंजली पाटील यांना‎ सांगितले असता याबाबत कुठे वाच्यता करु नको म्हणून‎ जातीवाचक शिविगाळ केली. या प्रकरणी तिघांवर‎ विनयभंग व अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंदवण्यात अाला.‎

बातम्या आणखी आहेत...