आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड शहरातील नगर राेड भागातील एका दुचाकी शोरूमसह गोडाऊनला रविवारी (दि. २७) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान, २ इन्व्हर्टर बॅटऱ्यांचा स्फोट झाला. वेळीच अग्निशमन विभागाच्या तीन बंबांद्वारे जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्रयत्न केले. या भीषण आगीत वित्तहानी माेठ्या प्रमाणावर झाली . रविवारची सुटी असल्याने जीवितहानी टळली. या आगीत दोनशे दुचाकी जळाल्याची माहिती शोरूम मालक प्रदीप चितलांगे यांनी दिली. बीड शहरातील नगर राेड येथे प्रदीप चितलांगे यांचे दुचाकीचे शाेरूम आहे. या ठिकाणी आॅफिस, दुचाकी, ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था असलेल्या शाेरूमला लागूनच सर्व्हिसिंग सेंटर आणि मागील बाजूस सहाशे पेक्षा अधिक दुचाकी उभ्या करता येईल असे माेठे दुचाकी गाेडाऊन आहे. रविवारी सुटी हाेती. सायंकाळी चाडेचारच्या सुमारास गाेडऊन भिंतीच्या बाहेरील लाइट बाेर्डमध्ये शाॅर्टसर्किट हाेऊन माेठी आग लागली. त्याच क्षणी गाेडाऊनजवळील व शाेरूममधील इन्व्हर्टर बॅटरींचा स्फोट झाला. त्यामुळे गाेडाऊन आणि शाेरूम अशा दाेन्ही ठिकाणी भीषण आग लागली.
सुरक्षा रक्षकाने याची माहिती मालक चितलांगेंना माेबाइलवर कळवली असता चितलांगेंनी अग्निशमन विभागास माहिती देऊन पाचारण केले. कर्मचाऱ्यांनाही बाेलावून घेतले. वेळीच अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न केले. या आगीमुळे ६०० पेक्षा अधिक क्षमतेचे गाेडाऊनमधील दुचाकींचे नुकसान झाले. न. प. अग्निशमन विभागाचे बी. ए. धायतडक, व्ही. एम. कानतोडे, आर. वाय. आदमाने, एस. डी. बहीर, जी. व्ही. ढोकणे, बी. सी. साबळे, एल. एस. टेकाळे, पठाण ताजोद्दीन आदींनी आग आटोक्यात आणली.
अंधार असल्याने दुसऱ्या दिवशी पंचनामा
शाेरूमला आग लागल्याची नाेंद ठाण्यात रात्री केली. दुचाकीसह इतर नुकसानीची अंदाजीत रक्कम दाेन काेटी असल्याचे नमूद आहे. रविवारी रात्री पंचनामा करणे शक्य नाही. साेमवारी पंचनामा केला जाईल. - बी. बी. दराडे, पाेलिस उपनिरीक्षक, शिवाजीनगर ठाणे.
आकस्मात जळीतची पाेलिसांत नाेंद
या आगीत गाेडाऊनमधील दुचाकी, शाेरूमधील संगणक, पंखे, फनिर्चर, कागदपत्रांच्या राेकार्डसह इतर नुकसान झाले. जवळपास दीड ते दाेन काेटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रदीप चितलांगे यांनी दिली. त्यानुसार शिवाजीनगर पाेलिसांनी आकस्मात जळीतची नाेंद केली आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक बी. बी. दराडे करत आहेत.
या आगीत दोनशे दुचाकी जळाल्या
शाेरूम, सर्व्हिसिंग सेंटर व गाेडाऊन अशा प्रकारे एजन्सीज आहेत. सहशे दुचाकी उभ्या करता येतील, असे गाेडाऊन आहे. या आगीमुळे शाेरूम, सर्व्हिसिंग सेंटर व गाेडाऊन जाणे शक्य नाही. शाॅर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत सरासरी दाेनशे दुचाकींचे नुकसान झाले. हे काेट्यवधी रुपयांचे नुकसान असेल, असा प्राथमिक अंदाज आहे. - प्रदीप चितलांगे , मालक, दीप एजन्सीज, बीड.
पहिला काॅल गोडाऊनला आग लागल्याचा आला अ्न बंब पाठवले
बीड शहरातील येथील दुचाकीच्या गोडाऊनला आग लागल्याचा पहिला काॅल अग्निशमन विभागात आला. तत्काळ एक गाडी घेऊन जवान घटनास्थळाकडे रवाना झाले. आगीची तीव्रता अधिक असल्यान दुसरा बंब बाेलावून घेतला. आग अटाेक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शाेरूमध्ये शाॅर्टसर्किट झाल्याची माहिती मिळाली अन् समाेरील भागातील शाेरूममध्ये आग लागल्याचे सांगितले. तत्काळ तिसरी गाडी (बंब) घटनास्थळी बाेलवून घेतली.
तीन बंबांच्या सहा फेऱ्या करून सायंकाळी साडेसहापर्यंत आग आटाेक्यात आणण्याचे प्रयत्न केले. - व्ही. एम. कानतोडे, प्रमुख फायरमन, अग्निशमन न.प. बीड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.