आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:आरोग्यमंत्र्यांच्या विरोधात बीड शहरात पन्नास खोके, एकदम ओके आंदोलन

बीड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोगस हिवताप प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात अधिकाऱ्यांची पाठराखण करुन त्यांच्यावर गुन्हे न नोंदवण्याच्या सूचना देणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधाते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पन्नास खोके, एकदम ओके आंदोलन करण्यात आले.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्हा हिवताप आधिकारी कार्यालयातून हंगामी फवारणी बनावट प्रमाणपत्र घेतल्याप्रकरणी ६९ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. प्रमाणपत्र देणाऱ्या तत्कालीन जिल्हा हिवताप आधिकारी डाॅ.के.एस.आंधळे, कीटक संमाहरक जीवन सानप व वरिष्ठ लिपिक के.के.सातपुते दोषी आढळले आहेत.

त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास शासनाने पत्रही दिले असताना हिंगोलीचे आ.संतोष बांगर यांच्या पत्रावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्थगिती दिली आहे. जिल्हा हिवताप कार्यालयातील जावक रजिस्टर, त्या कालावधीतील आधिकारी व संबधित लिपिक यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तआंदोलनात सादेक इंजिनिअर, शेख युनुस, शेख मुबीन, हमीदखान पठाण, जाकीर पठाण, अशोक येडे, रामनाथ खोड, भिमराव कुटे, प्रविण पवार आदी सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...