आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:अत्याचार प्रकरणी पतीसह नराधमावर अखेर गुन्हा

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:च्या पत्नीशी दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला शारीरिक संबंध ठेवायला लावल्याची घटना माजलगाव येथे चार महिन्यांनंतर उघडकीस आली असून पीडितेने माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पतीसह एका नराधमावर बुधवारी दि. २ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला.

माजलगाव तालुक्यातील एका ठिकाणी २६ जुलै २०२२ रोजी विवाहितेच्या घरात बाशेद इनामदार नावाची व्यक्ती बळजबरीने घुसून तिच्याशी शारिरिक संबंध करण्याची मागणी करत होता. हा सर्व प्रकार महिलेच्या पतीसमोर घडत असतांना तो गप्प होता. दरम्यान महिलेने आरडा-ओरड केली तेंव्हा नराधम बाशेद इनामदार याने तू जर आरडा आेरड केली तर तुझ्या मुलांना जिवंत मारून टाकेल अशी धमकी देत त्याने अत्याचार केला.

यानंतर सतत अत्याचाराचा प्रकार सतत घडत होता. नराधम बाशेद हा घरी आल्यानंतर विवाहितेचा पती घरातून निघून जात असे. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून विवाहितेने माजलगाव येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन बुधवारी दि.२ नोव्हेंबर २०२२ रोजी पोलिसांसमोर आपबीती कथन केली. या प्रकरणी पतीसह दुसरा आरोपी बाशेद इनामदार याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बाशेद इनामदार फरार झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...