आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:शाळांकडून पालकांची आर्थिक लूट; काळे चष्मे घालून अन् शिटी वाजवत केला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा निषेध

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या विरोधात सोमवारी सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी यांनी काळे चष्मे घालून आणि शिट्टी वाजवून आंदोलन केले. जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. खासगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट होत आहे. शिवाय, गणवेश, बूट, शालेय साहित्य हे खरेदी करण्यासाठी खासगी शाळांकडून ठराविक दुकानांचीच सक्ती केली जात आहे.

या दुकानांतून अव्वाच्या सव्वा दराने साहित्य विक्री होत असून यामुळे पालकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे. याबाबत निवेदन देऊन, मागणी करूनही शिक्षण विभाग लक्ष देत नसल्याने शिक्षण विभागाला मोतीबिंदू झाला कायॽ असे म्हणत निषेध म्हणून काळे चष्मे घालून व शिट्टी वाजवून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी लक्ष घालण्याची मागणी केली. या वेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. गणेश ढवळे, शिक्षण हक्क कार्यकर्ते मनोज जाधव, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष युनूस शेख, रामनाथ खोड, मोहम्मद मोइज्जोद्दीन, बलभीम उबाळे, सुदाम तांदळे, आबेद सय्यद, सय्यद आजम आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...