आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग:बीडमधील जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागास आग

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धानोरा रोड परिसरात असलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आग लागली. जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पोलिस मुख्यालयाच्या बाजूला धानोरा रोडलगत आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचे कामकाज या इमारतीतून चालते. दरम्यान, बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास या इमारतीला भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्यावर आग लागल्याचे समोर आले. विभागाचे बहुतांश रेकॉर्ड जळाले असल्याचे परिस्थितीवरून दिसून आले.

संशयाचा येतोय ‘धूर’जिल्ह्यात सध्या जल जीवन मिशन योजनेत झालेला कोट्यवधींचा घोटाळा गाजत आहे. याची चौकशीही सुरू आहे. असे असतानाच पाणीपुरवठा विभागाला भीषण आग लागल्याने या आगीतून संशयाचा धूर येत असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...