आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाच्या ढिगाऱ्याला आग:जिनिंगमधील कापसाला आग लागल्याने नुकसान

दिग्रस3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मानोरा मार्गावर असणाऱ्या श्री श्री माऊली जिनिंगमध्ये असणाऱ्या कापसाच्या ढिगाऱ्याला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी दि. ९ डिसेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वेळीच नगरपालिका अग्निशमन दलाने पोहोचून आग एक तासात विझवल्याने अनर्थ टळला असल्याची माहिती दिली आहे.

ा श्री श्री माऊली जिनिंगमध्ये सध्या कापसाची आवक सुरू असल्याने कापसाचे ढिगारे लावलेले आहेत. या ढिगाऱ्यांपैकी एका ढिगाऱ्याला अचानक आग लागल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी सागर शेळके, अश्वीन इंगळे, म.नासीर, ड्रायव्हर अंकुश इंगोले यांनी घटनास्थळी पोहोचून कापसाच्या ढिगाऱ्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या कापसाच्या ढिगाऱ्याजवळ कोणतेही विद्युत पुरवठा दिसत नाही. त्यामुळे ही आग कशी लागली याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दिग्रस शहरात असलेल्या अनेक जिनिंग मध्ये आग लागल्याच्या घटनाी घडल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...