आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:ट्रॉलीच्या साहाय्याने जनावरांसाठी उभ्या केलेल्या शेडला आग; नऊ जनावरे भाजली, 2 ट्रॉल्या खाक

धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धारूर तालुक्यातील गोपाळपूर अन् चारदरी येथे घडल्या घटना

धारूर तालुक्यातील गोपाळपूरअंतर्गत हंगे वस्ती येथे दोन ट्रॉलीच्या साहाय्याने जनावरांसाठी पॉलिथिनचे शेड उभे करण्यात आले होते. परंतु उभ्या केलेल्या शेडच्या ट्रॉलीला अचानक आग लागून नऊ जनावरे भाजल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दोन नव्या ट्रॉलीही जळून खाक झाल्या आहेत.

हंगे वस्ती येथे बाबासाहेब दत्तोबा हंगे यांच्यासह दोन भावांचे जनावरे बांधण्यासाठी वस्तीपासून अर्धा किमी अंतरावर शेतामध्ये दोन ट्रॉल्या उभ्या करून ताडपत्रीच्या साह्याने सावली करण्यात आली होती. या सावलीला आठ म्हशी व एक गाय बांधण्यात आली होती. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक ट्रॉलीच्या चाकांना आग लागल्याची घटना घडली. या आगीने मोठे रूप धारण केले होते. परंतु शेडमध्ये बांधण्यात आलेली नऊ जनावरे अखेर दोरखंड तोडून बाहेर पळाले. यावेळी आगीच्या जाळामुळे मोठ्या प्रमाणात जनावरे भाजली आहेत तर ट्रॉली जळून अक्षरश: कोळसा झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भाजलेली जनावरे वाचतील का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सायंकाळी उशिरापर्यंत तलाठी, मंडळ अधिकारी यांनी पंचनामा केलेला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...