आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरारक अनुभव:फायरिंग अन् बॉम्बस्फोट झाले; 20 किमी चालून गाठली सीमा

आष्टी7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • थरारक अनुभव युक्रेनमधून परतलेल्या आष्टीच्या अनिकेतची आपबीती

शहरातील मुर्शदपूर येथील भाऊसाहेब लटपटे यांचा मुलगा अनिकेत याने वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमधील खार्कीव्ह येथील नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत एमबीबीएस प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. रशियाने हल्ला केल्याने अनिकेत युक्रेनमध्ये अडकला होता. धाडस आणि सीमेवर आल्यानंतर भारतीय दूतावासाची मदत यामुळे अनिकेत सुखरूप मायदेशी परतला आहे. युक्रेनमधून दिल्ली आणि बुधवारी सकाळी अनिकेतचे शहरात आगमन झाले. यावेळी औक्षण करून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

युद्धभूमीत बाहेर पडण्याचा थरारक अनुभव यावेळी अनिकेतने सांगितला. शैक्षणिक पहिल्या वर्षाचा पहिला दिवस २३ फेब्रुवारी बॉम्बस्फोटाच्या मोठ्या आवाजाने सुरू झाला. त्यानंतर समजले की रशियाने युद्ध सुरू केले आहे. हॉस्टेलमधील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी बंकरमध्ये आश्रय घेतला. दोन तारखेला येथून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आम्ही रेल्वेस्टेशनवर गेलो. तिथे रेल्वे नव्हती. दरम्यान,आमच्या समोर फायरिंग झाली, बॉम्ब पडले. यामुळे आम्ही सर्वांनी चालत जात सीमा गाठण्याचे ठरवले. प्रत्येक विद्यार्थी १० ते १५ लिटर पाणी घेऊन होता. २० किमी चालत प्रवासात अन्न नव्हते, काही सीनियर विद्यार्थी एनर्जी बार देत.काही अंतर पार केल्यानंतर खासगी बस करून आम्ही सीमा गाठली. येथे भारतीय दूतावासाने मदत करत दिल्लीत आणले.

तेथून महाराष्ट्र शासनाच्या मदतीने आज सकाळी घरी आलो, असा अंगावर शहरे आणणारा अनुभव अनिकेत याने कथन केला. एकूण परिस्थिती भयावह होती. अनेक विद्यार्थी अजूनही अडकून पडले होते. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न शासनकाडून सुरू होते. भारतीय दूतावासातून मदत मिळते आहे, असे तो म्हणाला.

शैक्षणिक वर्षाचा पहिलाच दिवस अन् पहाटे युद्ध सुरू
युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षणाचा अनिकेतचा पहिलाच दिवस सुरू झाला तो २३ फेब्रुवारीला नवा देश, नवे लोक अशा परिस्थितीत पहिल्याच दिवशी शहरावर बॉम्ब फेकले गेले. त्यानंतर युद्ध सुरू झाल्याची माहिती मिळाली. तेव्हा अनिकेत आणि त्याचे सहकारी झोपेतच होते. त्यानंतर बंकरमध्ये ७ दिवस काढले. अनिकेत म्हणाला, आमच्यासमोर फायरिंग, बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर आम्ही सर्वांनी काही अंतर चालत तर काही खासगी बसने जात बॉर्डर गाठली. तेथून भारतीय दूतावासाने आम्हाला मायदेशी आणले.

बातम्या आणखी आहेत...