आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र ओपन:महिलांसाठी बीड येथे होणार पहिली‎ स्वतंत्र ओपन जिम : आ.क्षीरसागर‎

बीड‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह संपूर्ण मतदारसंघातील‎ नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, याकरीता ‎आमदार संदीप क्षीरसागर यांनी आवश्यक ‎त्याठिकाणी आपल्या निधीतून ओपन जिम ‎उभारल्या. याच धर्तीवर आता बीड‎ शहरातील छत्रपती संभाजी महाराज‎ क्रीडांगण येथे महिलांसाठी जिल्ह्यातील‎ पहीली स्वतंत्र जिम उभा करण्यात येणार ‎असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी ‎सांगितले.‎ आमदार क्षीरसागर यांनी १७ नोव्हेंबर‎ रोजी रोजी सकाळी शहरातील‎ नागरिकांसाठी व्यायामाचे केंद्र असलेल्या‎ छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण व‎ आयटीआय ग्राउंडवर नगरपरिषदेचे‎ मुख्याधिकारी व नगरसेवकांना सोबत‎ घेऊन भेट दिली.

यावेळी व्यायामासाठी‎ आलेल्या नागरिकांची भेट घेऊन संवाद‎ साधत याठिकाणी असणार्‍या असुविधा‎ जाणून घेतल्या. याप्रसंगी महिलांनी संवाद‎ साधताना आमदारक्षीरसागरांकडे स्वतंत्र‎ ओपन जिम असावी अशी अपेक्षा व्यक्त‎ केली. यावर क्षीरसागर यांनी ऑन द स्पॉट‎ निर्णय घेत माझ्या आमदार निधीतून‎ ‎ महिलांसाठी स्वतंत्र ओपन जिम उभारली‎ जाईल, असे आश्वासित केले. दरम्यान,‎ नविन लाईट पोल बसवणे,जुने लाईट पोल‎ दुरूस्ती करणे, स्वच्छतागृह दुरूस्ती‎ करणेसाठीच्या सुचना आ.क्षीरसागर यांनी‎ नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी यांना‎ केल्या. यावेळी नागरिक हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...