आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती:घरकुलधारकांसाठी पहिला हफ्ता वर्ग; आष्टी येथे आमदार धस यांच्या प्रयत्नांना यश, नगराध्यक्षा पल्लवी धोंडेंची माहिती

आष्टी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजनेचा दुसऱ्या टप्प्यातील ६४४ घरकुल धारकांचा हफ्ता राज्य शासनाच्या वतीने आष्टी नगर पंचायतकडे सुपूर्द करण्यात आला. ६ कोटी ४४ लाख रूपयांचा हा निधी वर्ग झाला असून, हा निधी मिळविण्यासाठी आमदार धस यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे हा निधी प्राप्त झाला असून या संबंधित घरकुल धारकांनी कामे सुरू करण्याचे आवाहन नगराध्यक्षा पल्लवी धोंडे यांनी केले आहे.

आष्टी येथील नगर पंचायत कार्यालयात शुक्रवारी (ता.६ मे) रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा धोंडे बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुध्दे यांच्यासह सर्व विभागाचे सभापती, अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. पुढे बोलतांना नगराध्यक्षा धोंडे म्हणाल्या, आष्टी शहराचा आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाने चेहरा मोहरा बदलला असून आणखीही विकास कामे केली जात आहेत. अगोदर पहिल्या टप्प्यात जवळपास ९०२ घरकुले मिळाले असून, त्यातील ८० टक्के घराचे कामही पुर्ण झाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील जवळपास ६४४ घरकुले मंजूर झाले आहेत. या लाभार्थ्यांचा पहिला हफ्ता राज्यशासनाचा वतीने एक लाख रूपयेप्रमाणे ६ कोटी ४४ लाख रूपये नगर पंचायत कार्यालयात वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या टप्प्यात मंजूर असलेल्या घरकुल धारकांनी आपल्या घराचे स्वप्न पुर्ण करावे, असे आवाहन ही नगराध्यक्षा पल्लवी धोंडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...