आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांत गुन्हा दाखल:एसटी डेपोत लावलेले पाच ट्रॅक्टर पळवले

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेले ९ ट्रॅक्टर महसूल प्रशासनाने एसटीच्या गेवराई आगारात लावले हाेते मात्र,यातील पाच ट्रॅक्टर सुरक्षा रक्षकांना अरेरावी करुन पळवून नेल्याची घटना घडली. गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल केला. आगाराचे सुरक्षा रक्षक सखाराम किसन नागरे यांनी याबाबत गेवराई पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, सहकारी अशोक खताळसह ते बुधवारी रात्रपाळीवर कार्यरत होते. यावेळी आगाराच्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारुन सहा ते सात अनोळखी व्यक्ती आत प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...