आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलींनी आयुष्यात काहीतरी घडायचे असेल तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन डॉ.स्वाती कुलकर्णी यांनी केले. सिद्धेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास मोराळे उपस्थित होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, एकविसाव्या शतकामध्ये आज महिला खूप प्रगत झालेल्या आहेत. यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांती करावीत.
मुलींनी कुठेही मागे पडता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. सुहास मोराळे म्हणाले की, वेळप्रसंगी समाजाकडून हीन वागणूक मिळाली असताना देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. प्रास्ताविक डॉ. विकास बोरगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रमेश गटकळ यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रेम राठोड यांनी मानले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.गजानन होंन्ना, डॉ. युवराज मुळये,प्रा.लक्ष्मीका ंत सोन्नर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्याप िका व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक- स्वयंसेविका व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.