आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बीड अन्न औषध प्रशासनातर्फे जिल्ह्यात जनजागृतीसाठी ५ ऑगस्टपासून अन्न सुरक्षा सप्ताहास सुरुवात झाली. हा सप्ताह १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या काळात जिल्हाभरातील प्रमुख शहरात पोस्टर्स, माहितीफलक लावणार आहेत, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली. याबाबत गायकवाड म्हणाले की, अन्न सुरक्षा सप्ताहानिमित्त व्यापक जनजागृतीवर भर दिला जाईल. आहारात तेल, मीठ, साखरेचा जादा वापर रक्तदाब, मधुमेह, विस्मरण या व्याधींना निमंत्रण देणारा आहे. खाद्यतेल वापरताना ते भेसळीचे आहे की नाही याची खातरजमा करावी. याचबरोबर बाजारात स्वीट होम, बेकरीहून मिठाई खरेदी करत असताना मुदतीची तारीख पाहूनच या पदार्थांची खरेदी करावी.
उघड्यावरील अन्नपदार्थ सेवन करण्याचे टाळा
रस्त्यावरील हातगाड्यांवरच्या अन्नपदार्थांचे सेवन काही लोक करतात. ते टाळण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण उघड्यावरील पदार्थ खाल्ल्याने विविध आजार बळावतात. त्यामुळे त्यांचे सेवन कटाक्षाने टाळावे. झाकून ठेवलेले अन्नपदार्थ खावेत. -महेंद्र गायकवाड,अन्न सुरक्षा अधिकारी, बीड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.