आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत पुस्तके:आनंददायी शिक्षणासाठी; पहिल्याच दिवशी 3 लाख 53 हजार 116 विद्यार्थ्यांना मिळतील मोफत पुस्तके

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आनंददायी व कृतियुक्त शिक्षण मिळावे या उद्देशाने पुणे बालभारतीने मागील वर्षापासून “खेळू करू शिकू’ हे नवे पुस्तक पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात दिले आहे. मागील वर्षी कोरोनामुळे हे पुस्तक बदलेले असले तरी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना या पुस्तकाची माहिती नव्हती. परंतु यंदा सोमवार, १३ जून २०२२ पासून पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होत असल्याने या पुस्तकातून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व कळणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवसापासून हा नवा विषय विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळणार आहे.

बीड जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या ३ लाख ५३ हजार ११६ विद्यार्थ्यांना येत्या सोमवार १३ जून २०२२ राेजी शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पुस्तके दिली जाणार आहेत. यात मराठी माध्यमाच्या ३ लाख १५ हजार ६०१० विद्यार्थ्यांना, उर्दू माध्यमाच्या ३७ हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळणार आहेत. यंदा जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ३ लाख ३२ हजार ३९९ संचाची मागणी बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मार्च २०२२ मध्ये पुणे बालभारतीकडे केली होती. त्यापैकी आतापर्यंत ८५ टक्के पुस्तके जिल्ह्यात आली आहेत.

आणखी पंधरा टक्के पुस्तके वाहतूकदाराने वाहने पुरवली नसल्याने जिल्ह्यात आलेली नाहीत. पंधरा दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला पुस्तके मिळाली आहेत. येत्या १३ जून २०२२ रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत. मागील वर्षीपासून पहिली ते पाचवीपर्यंत “खेळू करू शिकू’ हे नवीन पुस्तक बदलले आहे.

जुनी पुस्तकेही यंदा जमा केली
यंदा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडे सुस्थितीतील शिल्लक पुस्तके शाळा स्तरावर जमा करण्यात आली आहेत.या पुस्तकांचा उपयोग पुन्हा केला जाणार आहे.
-नारायण नागरे, सहायक कार्यक्रमाधिकारी, समग्र शिक्षा अभियान

१ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही असतील पुस्तके ?
इयत्ता पहिली ते दुसरी : बालभारती, गणित, इंग्रजी, खेळू करू शिकू ही पुस्तके असतील, तर इयत्ता तिसरी : बालभारती, गणित, इंग्रजी, खेळू करू शिकू ,परिसर अभ्यास, बीड जिल्हा. इयत्ता चौथी व पाचवी : बालभारती, गणित, इंग्रजी, खेळू करू शिकू ,परिसर भाग-१, परिसर भाग -२. तर सहावी, सातवी आणि आठवीसाठी बालभारती, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान, हिंदी, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र या विषयाची पुस्तके असतील.

बातम्या आणखी आहेत...