आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:चार दिवसांत दुसऱ्यांदा कार दरीमध्ये‎ कोळसली, महादेवदरात चौघे जखमी‎

आष्टी‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथील‎ महादेव दरा घाटात चालकाचा ताबा‎ सुटल्याने कार खोल दरीत कोसळून चारजण‎ जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री‎ साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या‎ घाटात चार दिवसांत दुसरा अपघात झाल्याने‎ येथे सुरक्षा कठडे बसवण्याची मागणी केली‎ जात आहे.‎ तालुक्यातील बीड सांगवी येथील महादेव‎ दरा घाटात ६ मार्च रोजी नातेवाईकाच्या‎ अंत्यविधीसाठी जाताना अज्ञात वाहनाने‎ हुलकावणी दिल्याने कार दरीत कोसळून‎ शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला होता.

ही‎ घटना घडून चार दिवस होत नाही तोच‎ गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता पुन्हा या‎ घाटात एक कार दरीत कोसळून अपघात‎ झाला. अंबाजोगाई येथील चार जण‎ कारमधून (एम. एच-४४,टी.८९८९) आष्टी‎ कडे येत होते. दरम्यान,घाटात गुरुवारी रात्री‎ साडेअकराच्या सुमारास वळणार गाडीवरील‎ ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली. यात‎ चारजण जखमी झाले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...